कोकीसरे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी अनंत नेवरेकर यांची निवड..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 25, 2023 15:27 PM
views 494  views

वैभववाडी : कोकीसरे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत भिकाजी नेवरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोकीसरे गावची नुकतीच ग्रामसभा झाली. या सभेत नवीन तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात आली. सभेमध्ये नेवरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सर्वांनुमते हे अंतिम करण्यात आले. नेवरेकर यांनी गावच्या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम पाहिले होते. तसेच सोसायटीचे संचालक म्हणून यशस्वी काम केले होते. तसेच त्यांचे गावात सामाजिक कामातही नेहमी सहभाग असतो.