वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी अनंत फोंडके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 29, 2025 18:02 PM
views 29  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी अनंत फोंडके यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नुतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून तहसीलदार काम पाहणार आहेत.

  जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या आहेत. वैभववाडी तालुक्याच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते अनंत फोंडके यांची निवड झाली आहे. श्री फोंडके हे गेली अनेक वर्षे यामाध्यमातून काम करीत आहेत. तालुक्यातील अनेक गरजू महिला व निराधार व्यक्तींना त्यांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या शिफारशीनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे.

 तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.

अध्यक्ष: अनंत फोंडके,

सदस्य:अभय कांबळे,मानसी रावराणे,नवलराज काळे, गणेश पवार,सिद्धेश रावराणे, स्वप्नील खानविलकर, उदय मुद्रस, बाळकृष्ण वाडेकर, परशुराम इस्वलकर व शासकिय प्रतिनिधी सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांची निवड करण्यात आली