गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम...!

Edited by:
Published on: January 09, 2024 17:08 PM
views 912  views

सावंतवाडी : बुलढाणा जल्लोष युवाई ग्रुप आयोजित राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेत राज्यभरातून अनेक रिल्स ग्रुप चा समावेश होता .त्यातून सुपर फाईव्ह रिल्स ग्रुप निवडले गेले. या सुपर फाईव्ह मधून एक ते तीन क्रमांक काढले गेले. या बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने बाजी मारत प्रथम क्रमांकवर आपला शिक्कामोर्तब केला.

या रिल्स मध्ये गौरी बांदेकर अवंती पंडित, अंकिता पवार ,भारती परब, गजेंद्र कोठावळे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अगदी अल्पावधीतच गौरीबांदेकर रिल्स ग्रुपने कोकणापासून सुरुवात करून संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या रिल्सचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यापूर्वीही गौरी बांदेकर रिल्स ग्रुप विविध रिल्स स्पर्धांमध्ये अव्वल ठरला आहे. यासाठी विविध स्तरातून या ग्रुपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.