अनंत पिळणकरांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

Edited by:
Published on: April 04, 2026 12:14 PM
views 303  views

कणकवली : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनंत पिळणकर यांचा वाढदिवस 3 एप्रिलला निवासस्थानी जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

 यावेळी कणकवलीच्या नगराध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख व कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गुरुनाथ पिळणकर, अजित आचरेकर, राष्ट्रवादी शरद पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, महेश चव्हाण, उत्तम तेली, राजू वाघाटे, बबन नारकर, उत्तम नारकर, प्रकाश पिळणकर, प्रवीण पिळणकर, स्वामी नारकर, विकास मुंज, प्रशांत आचरेकर, प्रकाश मडवी, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, नवीन कुरली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, नामदेव नारकर, चंद्रकांत नारकर, पिळणकर परिवार व मित्रमंडळी उपस्थित होती.