जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर यांचा होणार सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: September 17, 2025 19:50 PM
views 138  views

सावंतवाडी : ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डॉमेस्टिक काऊन्सिलच्यावतीने जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. 'हिंदुस्थानातील सर्वाधिक पसंतीचे रिटेलर' म्हणून त्यांना गौरविण्यात येणार आहे. 

वांद्रे येथील जिरो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान जेम्स अॅण्ड ज्वेलरी प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून आनंद पेडणेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एका छोट्या कारखान्यापासून सुरू झालेले पेडणेकर ज्वेलर्स हा आता देशातील विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड बनला आहे. संस्कृती व परंपरेला नाविन्याची जोड देत हा ब्रँड यशस्वी करण्यात आनंद पेडणेकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.