तोल गेल्याने वृद्ध कोसळला मोती तलावात

Edited by: विनायक गांवस
Published on: April 17, 2025 10:57 AM
views 177  views

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एका वृद्धाचा तोल गेल्याने ते मोती तलावात कोसळले. तीन मुशीजवळ काल सायंकाळी ही घटना घडली. या व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे.

आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी ग्रृपसोबत ते गप्पागोष्टी करत होते. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात कोसळले. त्यावेळी त्यांचे सहकारी संभाजी कांबळे व बेंजमिन डिसोजा यांनी आरडाओरड केली. ती ऐकून सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिमन्यू भोसले व पवन बिद्रे यांनी तलावात उडी घेऊन त्या व्यक्तीला वाचविले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

वाहतूक पोलिसांसह सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोरगावकर यांनी शिडीची व्यवस्था केली. घटनास्थळी सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.