आठ वर्षीय मुलाला अज्ञात दुचाकीची जोरदार धडक

Edited by: विनायक गांवस
Published on: September 12, 2024 13:47 PM
views 707  views

सावंतवाडी : रस्ता ओलांडताना आठ वर्षीय मुलाला अज्ञात दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली. यात तो मुलगा गंभीर जखमी झाला‌. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी धाव घेत जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. धडक देत पलायन केलेल्या दुचाकी स्वाराचा शोध सुरू आहे.