हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचं आवाहन

Edited by: विनायाक गावस
Published on: July 06, 2023 11:36 AM
views 163  views

सावंतवाडी : हिंदूंमध्ये शौर्यजागरण करून लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी, तसेच भारताची अधोगती करणार्यान धर्मनिरपेक्ष लोकशाहीला पर्यायी आदर्श राज्यव्यवस्था म्हणून धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र स्थापन करायचे आहे. हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटित होऊया आणि आपल्या क्षमतेनुसार तन-मन-धन समर्पित करूया, असे आवाहन सनातन संस्था सिंधुदुर्ग न्यासाच्या वतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी जिल्ह्यात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा !’ याविषयावरील मार्गदर्शनात वक्त्यांनी केले. जिल्ह्यात संतांच्या वंदनिय उपस्थितीत अन् भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात एकूण ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सकाळी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सच्चिदानंद ‘परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची धर्मप्रचारक संतांसोबत झालेली अविस्मरणिय भेटी’चे चलचित्र (व्हिडिओ) दाखवण्यात आला. कुडाल येथे सनातनचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांनी ‘शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रीगुरुंनी सांगितलेल्या अष्टांग साधनेचे महत्त्व आणि त्यासाठी करायचे प्रयत्न’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अन्य ठिकाणी याविषयीची ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली. दुपारच्या सत्राचा प्रारंभ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करून करण्यात आला. त्यानंतर श्री गुरुंची आरती, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनाचा चलचित्रपट दाखवण्यात आला. ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा !’ याविषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सनातनच्या गुणवंत विद्यार्थी साधकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.  

कार्यक्रमस्थळी स्वसंरक्षण प्रशिक्षण, सनातनची नियतकालिके, प्रथमोपचार, सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष लावण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड; मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली; श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, रेल्वे स्थानक रस्ता, कुडाळ; मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण;  साई दरबार सभागृह, वेंगुर्ला; साळगावकर मंगल कार्यालय, आरवली, वेंगुर्ला; खानोलकर मंगल कार्यालय, मळगाव, सावंतवाडी; श्री महालक्ष्मी - स्थापेश्वर मंदिर सभागृह, डेगवे, सावंतवाडी आणि आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबांबर, दोडामार्ग या ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. 

*संतांची वंदनिय उपस्थिती*

१. सनातनचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान यांची कुडाळ येथे झालेल्या कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात, तर मालवण येथील कार्यक्रमास दुपारच्या सत्रात उपस्थिती लाभली होती. 

२. डेगवे येथे झालेल्या कार्यक्रमास पानवळ (बांदा) येथील संत प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. सौ. लक्ष्मी (माई) नाईक यांची उपस्थिती लाभली होती. 

३. कुडाळ येथे तालुक्यातील मुळदे येथील प.पू. घडशी महाराज यांची उपस्थिती लाभली होती. या वेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. 

या वेळी संतांचा सन्मान करण्यात आला. 

 मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन  

वेंगुर्ला येथे वेदमूर्ती श्री. भूषण जोशी आणि मालवण येथे मेजर श्रीपाद वासुदेव गिरसागर यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन केले.  

 

संविधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा !’ या विषयावर प्रवचन

देवगड येथे श्री. हेमंत मणेरीकर, कणकवली येथे सौ. ज्योत्स्ना नारकर, कुडाळ येथे अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, मालवण येथे श्री. आनंद मोंडकर, वेंगुर्ला येथे श्री. भरत राऊळ, आरवली येथे शरद राऊळ, मळगाव येथे सौ. अंजली मणेरीकर, डेगवे येथे श्री. राजेंद्र पाटील, झरेबांबर येथे हिंदु जनजागृती समितीचे युवासंघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी ‘संविधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा !’ या विषयावर मार्गदर्शन केले.