आचारसंहितेच्या पालनाकरिता प्रशासकीय यंत्रणा कार्यरत

Edited by: मनोज पवार
Published on: October 21, 2024 08:09 AM
views 223  views

मंडणगड :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागलेली असून 263 - दापोली विधानसभा मतदार संघातील मंडणगड तालुक्यात काटेकोर पालन करण्यासाठी महसुल पोलीस प्रशासन व अन्य यंत्रणा सज्ज झाल्यास असून 14 ऑक्टोंबरपासूनच याची अमंलबजावणी सुरु झाली आहे. समर्थनगर दापोली फाटा भिंगळोली येथे मंडणगड पोलीस स्टेशनचे भरारी पथक (एफ.एस.टी)  मधील अधिकारी/कर्मचारी यांची विधानसभा निवडणूक अनुषंगाने कसून वाहनांची तपासणी चालू आहे. पोलीस स्थानकाचे हद्दीत येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरु असुन या संदर्भातील संशायस्पद हालचालीवर पोलीसांचे बारीक लक्ष आहे.

निव़डणुकांचे कालवाधीत पोलीसस्थानकाचे हद्दीत सर्व प्रकारचे विनापरवाना व बेकायदेशीर मद्य विक्री साठवणुक व वाहतूकीचे विरोधात पोलीस सक्रीय झाले आहेत. 20 ऑक्टोंबर 2024 रोजी तिडे येथील अक्षय म्हाप्रळकर वय (31) याचे विरोधात देशी दारु बाटल्या गैर कायदा, बिगरपरवाना ताब्यात बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारुंबदी अधिनयम 1949 कलम 65 (ई)  अन्वये गुन्हा दाखल केला आहे.