कुणकेश्वर पं.स.साठी अमोल लोके यांचा उमेदवारी अर्ज

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2026 18:50 PM
views 27  views

देवगड : देवगड मध्ये बुधवारी मोठ्या संख्येने उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिवसेना (शिंदे गट) तर्फेकुणकेश्वर पं.स.साठी अमोल विजय लोके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 

यावेळी माजी आमदार अजित गोगटे,भाजपा तालुकाध्यक्ष सदाशिव भुजबळ, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर यांच्यासह मंदार गुरव, शैलेश लोके, विजय वाळके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.