
सावंतवाडी : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवरायांचा इतिहास ज्यांनी घराघरात पोहोचविला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले. शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे कोकण महीला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जंगी स्वागत केले.