सावंतवाडी विश्रामगृह दुरुस्तीची तज्ज्ञ शासकीय बांधकाम अधिकारी यांनी वेळीच करावी पाहणी - अमित वेंगुर्लेकरांची मागणी

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 15, 2023 12:35 PM
views 139  views

सावंतवाडी : येथील विश्रामगृह दुरुस्तीची जबाबदारी ज्या ठेकेदाराला दिली आहे त्या ठिकाणी विश्रामगृह दुरुस्तीची निविदा प्रक्रिया ( टेंडर) मध्ये कामाच्या पद्धतीने,नियोजित  दुरुस्ती करण्यात वापरण्यात आलेले साहित्य हे निविदेत ( टेंडर) मध्ये नमूद साहित्य पात्रतेप्रमाणे सदर दुरुस्ती प्रक्रियेत वापरण्यात आले आहे का? याबाबत तज्ज्ञ शासकीय बांधकाम अधिकारी यांनी वेळीच सावध राहून योग्यती पाहाणी करून तसा तपासणी लेखी अहवाल संबंधित जबाबदार शासकीय अधिकारी कार्यालयात सादर करावा.जर सदरच्या दुरुस्ती कामात तफावत आढल्ल्यास संभदित ठेकेदार यांना बोलावून योग्य तिथे ठरलेल्या दुरुस्ती सामुग्री प्रमाणेच त्याच योग्यतेचे दुरुस्ती साहित्य वापरून काम पूर्ण करून घ्यावे. सावंतवाडी विश्रामगृह सुशोभीकरण बाबत वापरण्यात येणाऱ्या साहित्यात कोणत्याही त्रुटी अथवा हलक्या प्रतीचे साहित्य सदर ठेकेदार यांच्या नियोजित दुरुस्ती कामात आढलल्यास संबंधित शासकीय अधिकारी यांनी वेळीच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. सावंतवाडी विश्रामगृहातील खोल्यांमध्ये जे सीलिंग करण्यात आले आहे, त्या दुरुस्तीमध्ये वरील जुन्या फ्रेम बदलण्यात आल्या आहेत का? या बाबत ही पाहणी करण्यात यावी. अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.