अमित शहांच्या 'त्या' वक्तव्याचा दोडामार्गमध्ये निषेध

Edited by:
Published on: December 27, 2024 15:36 PM
views 273  views

दोडामार्ग : परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेणाऱ्या गृहमांत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करत सरकार विरोधार घोषणा बाजी करत आज दोडामार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व उबाठा शिवसेना व विविध संघटनेने आज दोडामार्ग तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले. 

भारताचे संविधानाची वीटंबना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेणाऱ्या अमित शहा यांनी आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत संसदेत अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्व संघटना जाहीर निषेध करत. आज दोडामार्ग शहरातून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढला व तहसीलदार अमोल पोवार यांना लेखी निवेदन दिले. यावेळी गणपत जाधव, विजय जाधव लक्ष्मण  आयनोडकर, आयनोडकर आदी सांगतनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला सर्व बौद्ध समाज तसेच शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी उपस्थित होते. यावेळी गणपत जाधव म्हणाले की परभणी येथे जो परकार घडला त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या वतीने शांततेत आनोदलन सुरु होते.

मात्र, पोलिसांनी त्या आमच्या समाज बांधवांवर पोलीस बाळाचा वापर करून त्यात आमचा एक समाज बांधव सोमनाथ सूर्यवंशी शहीत झाला. त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव राज्य शासनाचा जाहीर निषेध  करत आहोत. तर ही घटना ताजी असताना संसदेत गृह मंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत आमच्या आंबेडकर प्रेमिच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळे सरकारमधील गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजिनामा देऊन घरी बसावे असे उबाठा चे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांना सर्व बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने निषेधार्थ निवेदन दिले.