
सिंधुदुर्गनगरी : आकाश फिश मिल ॲड फिश ऑईल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या विरोधात स्थानिक जनतेने पुकारलेल्या उपोषण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. गाव मौजे केळूस ता. वेंगुर्ला येथील आकाश फिश मिल ॲड फिश ऑईल प्रा, लिमिटेड कंपनी मार्फत होणाऱे प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाचे लक्ष वेधून न्याय मागण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले.
आजपर्यंत येथील अन्यायग्रस्त जनतेची दिशाभूल करण्यापलीकडे संबंधित विभागाने व राज्यकर्त्यांनी तसेच या भागाचे राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणारे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कडूनही दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अमित सामंत यांनी केला.
आपण व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे मिळून आपल्या मागण्यांबाबत माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार,खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देऊन हा प्रश्न लवकरात लवकर कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले.