राष्ट्रवादीचे फायरब्रॅण्ड जिल्हाध्यक्ष अमित सामंत

▪️वाढदिवस विशेष !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 20, 2023 22:47 PM
views 116  views

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार अन् राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकेकाळी दबदबा होता. जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठीचा तो सुवर्णकाळ होता. परंतु, गेल्या दहा वर्षांत बदललेल्या राजकीय परिस्थिती पक्षाचा चढता आलेख उतरत्या दिशेने सरकु लागला. अशातच ठाण्यातील राजकारण जवळून पाहिलेल्या सिंधुपुत्र अमित सामंत यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून जिल्हाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर गेल्या चार वर्षांत आठही तालुक्यात राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेऊ लागलीय. देवगड पासून दोडामार्गपर्यंत राष्ट्रवादी आशावादी झालेली दिसून आलीय. पक्षाला उभारी देणाऱ्या फायरब्रॅण्ड जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा आढावा....!


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असणारे अमित सामंत यांच बालपण ठाणे जिल्ह्यात गेलं. राष्ट्रवादीचे धडाकेबाज नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुशीत हे नेतृत्व तयार झालं. शांत, संयमी राष्ट्रवादी नेत्यांमधील फायरब्रॅण्ड पॅटर्न इथूनच आला. अमित सामंत यांच्या राजकारणाची सुरुवात एनएसयूआयच्या माध्यमातून झाली. 1990 साली विद्यार्थी दशेत असताना दोन वेळा ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. राज्य पातळीपर्यंतची पद त्यांनी या काळात भूषवली. त्यातच 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना शरदचंद्र पवार यांनी केली. पक्ष स्थापनेपासूनच त्यांनी पक्षाच घड्याळ हाती बांधत राष्ट्रवादी विचार जोपासला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार, कार्याध्यक्ष संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीनं प्रभावित होऊन सिंधुदुर्गात पक्षीय कामाला सुरुवात केली. पक्ष बळकटीसाठी मेहनत घेतली. यातच मध्यंतरीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कमवकुवत झाली. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी औषधाला देखील शिल्लक नसल्याचं विरोधकांकडून बोलल गेल. अशावेळी पक्षाचं गतवैभव पुन्हा आणण्यासाठी पक्षनेतृत्वानं जातीनिशी लक्ष घालत अमित सामंत यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर संपत चालेल्या राष्ट्रवादीनं कात टाकली. नवे-जुने अशा सर्वांना सोबत घेत त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली. देवगड ते दोडामार्ग असा झंझावती दौरा करत पक्ष संघटना मजबूत केली. तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रवाहात आणत राष्ट्रवादीचे सर्व सेल ॲक्टीव्ह केले. संघटना बांधण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, नंदुशेठ घाटे, व्हिक्टर डॉनटस आदींच्या सहकार्यातून संघटना मजबूत केली. पक्षाच्या विविध सेलच्या माध्यमातून कार्यकारणी वाढवत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. 


पक्षाच्या खडतर प्रसंगी नव्या दमाचे नेतेमंडळीं, निष्ठावंत कार्यकर्ते, कट्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांनी 

पक्षाची घोडदौड सुरु केली. युवकांची भक्कम ताकद पक्षासोबत उभी केली. पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या सावंतवाडीत कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या साथीनं संघटना मजबूत केली. नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत चमक दाखवली.कोरोना सारखं महाभयंकर संकट सिंधुदुर्ग जिल्हावर असताना आरोग्य सुविधांअभावी लोक किड्या मुंग्यासारखे मरत असताना विद्यमान आमदार-खासदार जे करू शकले नाहीत ते अमित सामंत यांनी करून दाखवलं. तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या निधीतून 50 बेडचं डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर निर्माण केल. देशाचे नेते, खासदार शरद पवार यांच्या हस्ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत याच ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. केवळ अमित सामंत यांच्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना दिलासा मिळाला. हे रूग्णालय सिंधुदुर्गवासियांसाठी जीवनदायी ठरलं. यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगात आक्रमक भूमिका घेत ते पहाडाप्रमाणे पाठीशी उभे राहिले. गेल्या वर्षभरात आंदोलन, मोर्चा काढत सरकारला जाब विचारले. महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेचा भावना सरकार दरबारी पोहचविल्या. मित्रपक्ष शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांना जाब विचारला. त्यांच्या विरुद्ध लक्षवेधी आंदोलन करत निषेध नोंदवला. 


2024 ला येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत असताना 'मविआ'चा आमदार, खासदार निवडून आणण्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंना बळ देत मतदारसंघात दहा वर्षापूर्वीं थांबलेल घड्याळ पुनश्च ॲक्टिव्ह करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. अशा या फायरब्रॅण्ड जिल्हाध्यक्षांना वाढदिवसानिमित्त मनपासून शुभेच्छा...!