...तर कानाखाली आवाजच निघेल !

मिटकरीला कपडे काढून मारू : मनसे नेते अमेय खोपकर
Edited by: विनायक गांवस
Published on: August 01, 2024 10:18 AM
views 456  views

सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करायची अमोल मिटकरीची लायकी काय ? तो घासलेट चोर आहे. आमच्या नेत्यांवर मिटकरी सारख्यांनी बोलू नये, नाहीतर कानाखाली आवाजच निघेल. यापुढे मिटकरीनी थोबाड चालवलं तर त्याला कपडे काढून मारणार असा सणसणीत इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला.

ते म्हणाले, अमोल मिटकरी त्याचा गावात घासलेट चोरून विकायचा. राज ठाकरेंवर टीका करायची त्याची लायकी नाही. अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी टीका करणं वेगळं. उबाठा शिवसेनेवर कितीही राग असला तरी पक्षप्रमुखांवर मी टीका करणं योग्य नाही. माझ्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, आमच्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, अमोल मिटकरी सारख्यांनी बोलू नये. तसं केलं तर कानाखाली आवाजच निघेल असा सणसणीत इशारा श्री. खोपकर यांनी दिला. 

दरम्यान, यापुढे लायकी नसलेल्या फळीतील जो व्यक्ती राज ठाकरेंवर टीका करेल तर त्यांच्या कानाखाली आवाजच निघणार, राज ठाकरेंवर टीका केली तर त्यांना मारायचं. आमच्यावर काय दाखल करायचे ते गुन्हे दाखल करा असा इशारा दिला. तर टीका करुन मिटकरी लपून बसला होता. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांची हिंमत झाली नाही मनसेच्या अंगावर यायची. त्यामुळे जर यापुढे मिटकरीनी थोबाड चालवलं तर त्याला कपडे काढून मारणार असा इशारा खोपकर यांनी दिला. यावेळी चित्रपट सेनेचे अध्यक्ष बंटी म्हशीलकर, मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सन्नी बावकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी इन्सुल्ली शाखा अध्यक्ष दिनेश मुळीक, अँड. राजू कासकर, केतन सावंत आदी उपस्थित होते.