
सावंतवाडी : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली. मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळानं हा उपक्रम राबविला.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली. मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळान हा उपक्रम राबविला. मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संस्थेचे सचिव प्रा.डाॅ.सचिन परुळकर यांच्याकडे रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्त केल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सदस्य माधव तुळसकर गुरुदास तिरोडकर महेश राऊळ सागर सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, संजय परब सुनील दुबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.