मुख्यमंत्री - शालेय शिक्षणमंत्र्यांच्या प्रयत्नातून रूग्णसेवेसाठी वेंगुर्ले शहरास रुग्णवाहिका..!

Edited by: दिपेश परब
Published on: November 13, 2023 11:59 AM
views 227  views

वेंगुर्ला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सी.एस.आर. मधून वेंगुर्ले शहरासाठी प्राप्त अत्याधुनिक रुग्णवाहिका नुकतीच शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळास चाव्या देत प्रदान केली.

वेंगुर्ले शहरातील नागरीकांची रूग्णसेवेची, रुग्णवाहिके अभावी होणारी परवड लक्षात घेऊन वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचेकडे अत्याधुनिक रूग्णवाहिकेची मागणी केली होती. त्यानुसार दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सी.एस.आर. मधून अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्द करून दिली.

या रूग्णवाहिकेचा वितरण सोहळा नुकताच स्वामीनी मंगल कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनिल मोरजकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, वेंगुर्ले शहर युवक प्रमुख संतोष परब, महिला शहर प्रमुख अँङ श्रध्दा बावीस्कर-परब, अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख, रविना राऊळ, मनाली परब, कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे कार्यकर्ते राजू परब, संजय परब, प्रदीप परब, बाळा परब, श्याम वालावलकर, भाऊ वालावलकर, सुनिल परब, आनंद शिरोडकर, विलास परब, देवीदास वालावलकर, अँङ एन.जे. गोडकर आदीसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरची रूग्णवाहिका रुग्णांना सेवा देण्यासाठी वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्र मंडळाला दिली असली तरी तिचा उपयोग तालुक्यातील रुग्णासाठी होणार असून रुग्णांना सवलत दरात ती सेवा देण्यास उपलब्ध असेल. असे वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेश येरम यांनी स्पष्ट केले आहे.