
वेंगुर्ला : कोचरे ग्रामपंचायत सरपंच तथा दिपक केसरकर यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश तेली व मित्र मंडळाच्या वतीने कोचरे व पंचक्रोशीतील अत्यावश्यक सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या भागातील एखाद्या रुग्णाला किंवा अपघात ग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परुळे ,कुडाळ, वेंगुर्ले येथून रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वाट पहावी लागत असे. याची गंभीरता लक्षात घेता ही रुग्णवाहिका लोकांच्या सेवेत घेण्यात आली आहे.
हि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगावकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. रुग्णवाहिका खरेदी करते वेळी देवदत्त साळगावकर यांच्या सहित माजी सरपंच करलकर, काका हंजनकर, विशाल वेंगुर्लेकर, म्हापणकर आदी उपस्थित होते. हि रुग्णवाहिका कोचरे येथे सेवा देण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच ही रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेसाठी दाखल केल्याने कोचरा पंचक्रोशीतून लोकांच्या वतीने जाहीर आभार ही व्यक्त करण्यात येत आहेत.