आंबोली सैनिक स्कूलचा वर्धापनदिन उत्साहात ; ब्रिगे. सावंत, प्रांताधिकारी पानवेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

'वेध' वार्षिक विशेषांकाचेही प्रकाशन!
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 24, 2022 15:08 PM
views 239  views

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा वर्धापन दिन दिनांक २२, २३ डिसेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. दि. २३ रोजी शाळेचे पॅट्रॉन ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पानवेकर (प्रांताधिकारी) हे उपस्थित होते. प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कॅडेट यश धुरी याच्या लावणी नृत्याने सर्वांची मने जिंकली.

 वर्षभरात जिल्हा व शालेय व विभाग स्तरावर क्रिडाप्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देवून प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये बेस्ट टिचर ऋषिकेश गावडे, भूषण पाटकर, अरूण गावडे, सतीश आईर, रूपेश आईर यांचा सत्कार करण्यात आले. डॉ. चंद्रकांत सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी २३ डिसें २०२२ रोजी ब्रिगे. सुधीर सावंत, पी. एफ. डॉन्टस व सर्व संचालक यांचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देवून उत्कृष्ट सैनिकी संचलन सादर केले. १२ वी च्या विद्यार्थ्यांची पासिंग आऊट परेड झाली. त्यानंतर छोटया सैनिकांनी कराटे, मल्लखांब, लेझिम, लाठीकाठी, व्हॅलीक्रॉसिंग व आबस्टॅकल्स इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली.

शाळेचा वार्षिक विशेषांक 'वैध' चे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आभार प्रदर्शन प्राचार्य सुरेश गावडे यांनी केले.

कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस, सचिव सुनील राऊळ, उपाध्यक्ष दिनानाथ सावंत, संचालक जॉय डान्टस, शंकर गावडे, शिवाजी परब,  विनायक शेणई, राजाराम वळंजू, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, कर्नल विजय सावंत, कॅप्टन डी. के. मोरे, चित्रा दिघे (अधिक्षक भ.नि.नि. वेतनपथक माध्य. शिक्षण) सैनिक ना. पतसंस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, संचालक चंद्रकांत शिरसाट, बाबुराव कविटकर, ललिता भोळे, आंबोली संरपंच श्रीम. पालयेकर, विजय नार्वेकर, पालक प्रतिनिधी श्रीम. समजिसकर, गंधाली मुंडले, श्रीम. आहेकर, प्राचार्य गुरूदास कुसगावकर, प्राचार्य प्रदीप शिंदे, श्री. सराफदार, गोविंद मोर्ये, श्रीधर गावडे, पत्रकार विजय राऊत, अनिल चव्हाण, सर्व शिक्षक आंबोली ग्रामस्थ, पालक पंचकोशीतील आजी-माजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.