
वैभववाडी : कोकिसरे नारकरवाडी येथील श्री. अंबाबाई देवालयाचा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह शनिवारी २३ डिसेंबरला होत आहे. या हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे सोमवारी २५ डिसेंबरला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी दुपारी महाप्रसाद होणार आहे. तर रात्री नारकरवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन नारकरवाडी उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात आले आहे.