
वैभववाडी : कोकीसरे नारकरवाडी येथील नारकरवाडी उत्कर्ष मंडळ यांच्यावतीने श्री अंबाबाई मंदिरात उद्या (ता.११डिसें) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. तसेच या सप्ताहानिमित्त १३ डिसेंबरला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली.
मोक्षदा एकादशी निमित्त येथील अंबाबाई मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षीही हा सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर सजविण्यात आला आहे.उद्या सकाळी या सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. या सप्ताहानिमित्त स्थानिक बुवांची वारकरी भजने होणार आहेत. त्याचबरोबर या सप्ताहानिमित्त शुक्रवार १३डिसेंबरला सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.