
वेंगुर्ले : कुडाळ - मालवणचे आमदार तथा शिवसेना नेते निलेश नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १५ ते १७ मार्च या कालावधीत मॅरेथॉन स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी इंडियन आयडल विनर "सलमान अली नाईट" हा भव्य संगीत कार्यक्रम होणार असून वेंगुर्लेवासीयांसह सिंधुदुर्ग वासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरैया फाउंडेशन चे सचिव धनंजय महाजन यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
स्वरैया फाउंडेशन आयोजित वेंगुर्ले येथिल या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला श्री महाजन यांच्यासह डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, प्रदीप वेंगुर्लेकर, राजू वजराटकर, राकेश सापळे, पंकज शिरसाट, तुषार भोसले आदी उपस्थित होते.
"सिंधुरन मॅरेथॉन" चे भव्य आयोजन
रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजीसकाळी ७ वाजता वेंगुर्ला कॅम्प येथून "सिंधुरन मॅरेथॉन" चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन ऑलिंपिक ला भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या दती चांद यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते बिंदू दारासिंग हे उपस्थित राहणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेत नगरपालिका वेंगुर्ला, रोटरी क्लब वेंगुर्ला लायन्स क्लब वेंगुर्ला, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, जिल्हा शिवसेना तसेच इतर सामाजिक संस्थांचा सहभाग असणार आहे. वेंगा बॉईज आयोजन पाहणार आहेत. अशी माहिती डॉक्टर प्रल्हाद मणचेकर यांनी दिली.
३ कि.मी. फन रन व ५ कि.मी. आणि १० की.मी. टाईम रन स्पर्धा होणार आहे. प्रथम ५ क्रमाकांना तसेच विविध वयोगटा साठी आकर्षक रोख बक्षीसे देण्यात येतील. या रन साठी 'गुगल फॉर्म' https://forms.gle/qDwQqbiZCBm5Kknd भरणे सहभागी रनर्सना अनिवार्य असेल. नोंदणी झाल्या नंतर तुम्हाला खाली एक *लिंक* दिसेल. त्यावर फक्त *क्लिक* करा. मग तुम्ही आमच्या *WhatsApp Group* ला जॉईन व्हाल. पुढील सर्व सुचना WhatsApp ला मिळतील. सहभागी धावक स्पर्धकानां टी शर्ट, पदक, सर्टीफिकेट, नाश्ता, सेल्फी पॉइंट, झुम्बा डान्स, प्रत्येक २.५ की.मी. ला हायड्रेशन बुथ असतील. फक्त प्रथम ३०० नोंदणी धारकानां टी शर्ट्स व पदक मिळतील. अधिक माहितीसाठी व्हि. प्रदीप ७४२०८०८४१६ किंवा के.प्रीती ९५०५९२५५६८ यांच्याशी संपर्क साधावा.
सलमान अली म्युझिकल नाईट आणि डान्स शो..
स्वरैया फाउंडेशन, आम. निलेश राणे प्रेमी व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १५ मार्च रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून वेंगुर्ला कॅम्प येथील मैदानावर प्रसिद्ध गायक इंडियन आयडल विजेता सलमान अली यांची म्युझिकल नाईट हा संगीत शो होणार आहे. सलमान अली यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नव्या जुन्या गाण्यांचा आस्वाद वेंगुर्लेवासियांना मिळणार आहे. या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह उपस्थित राहणार आहे, तसेच आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारी नृत्य अभिनेत्री सोनाली राऊत आणि इशा शाह यांची दिलखेचक नृत्ये होणार आहेत.
कांदळवन सफाई स्वच्छता मोहीम
दि १६ मार्च सकाळी ७ वाजल्यापासून कांदळवन सफाई स्वच्छता मोहीम चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सुनील डूबळे यांनी माहिती दिली. स्वरैया फाउंडेशन, नगरपरिषद वेंगुर्ला, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फॅटरनिटी क्लब, जिल्हा शिवसेना यांच्या सहभागाने ही सफाई मोहीम वेंगुर्ले कांदळवन येथे करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर
तिसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १७ मार्च सकाळी १० ते २ या वेळेत वेंगुर्ले येथे भव्य आरोग्य शिबीर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती रोटरी क्लबचे राजू वजराटकर यांनी दिली.
वेंगुर्ले गाडीअड्डा येथील डॉक्टर उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये हे शिबिर होणार आहे. स्वरैया फाउंडेशन, नगरपरिषद वेंगुर्ला, रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स फॅटरनिटी क्लब, संजीवनी हॉस्पिरल, जिल्हा शिवसेना यांच्या सहभागाने हे शिबिर होणार आहे. तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.










