माणगाव प्रभाग 4 मध्ये भाजपचे दत्ता कोरगावकर यांच्यासह तीनही उमेदवार विजयी होतील : महेश भिसे

दत्ता कोरगावकर यांनी चांगल काम केलय - महेश भिसे
Edited by: भरत केसरकर
Published on: December 17, 2022 12:34 PM
views 340  views

कुडाळ : माणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग चार मधील उमेदवार तरूण तडफदार उमेदवार दत्ता कोरगावकर यांच्यासह तीनही सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आणणारच असा आत्मविश्वास माणगावचे माजी उपसरपंच महेश भिसे यांनी केला आहे.विरोधक कितीही आरडाओरड करू देत माणगावची जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही.त्यामुळेच शिवसेनेने सत्तेची स्वप्ने बघू नये.2003 पासून आतापर्यंत आतापर्यंत सलग 20 वर्षे माणगावविसायांनी सत्ता आमच्याकडे दिलीय.याच कारण एकच आहे की आम्ही विकास करू शकतो हा विश्वास माणगाव मधील जनतेला आहे. त्यामुळे दत्ता कोरगावकर यांना पराभूत करण्यासाठी कितीही विरोधकांनी प्रयत्न केले आणि  वारेमाप वल्गना केल्या तरी दत्ता कोरगावकर यांना जनता विजयी करेलच. त्याच बरोबर सरपंच सौ. दुर्वा दीपक काणेकर ह्या विजयी होतीलच, असा दावा केला आहे. तर शिवसेनेने विजयाची स्वप्ने बघू नये, असाही इशारा महेश भिसे यांनी दिला आहे.