दारू विक्रीच 'विघ्न' नको ; दोडामार्ग भाजपने वेधलं लक्ष

Edited by: लवू परब
Published on: August 24, 2025 13:10 PM
views 242  views

दोडामार्ग : कोकणवासियांचा उत्साहाचा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विघ्नहर्त्याच्या सणात कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण तालुक्यात असलेली अवैध दारूची विक्री पूर्णपणे बंद व्हायला हवी. अन्यथा आमच्या भाजप पक्षाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जबाबदार पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन झाल्यास आमचा पक्ष जबाबदार राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सुरू असलेली अवैध दारूची विक्री तत्काळ बंद करा. कर्तव्यात कसूर आढळल्यास कारवाई निश्चित आहे हे लक्षात ठेऊन काम करा ही विनंती वजा इशारा भाजप पक्षाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस व पदाधिकऱ्यांनी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांची भेट घेऊन दिला. 

गुरुवारी कणकवली शहरात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः व फील्ड उतरत मटका बुकीवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे बरेच धाबे दणाणले आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांचे निलंबन देखील झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांची भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, युवामोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, शहराध्यक्ष राजेश फुलारी, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, सरचिटणीस भैया पांगम, स्वप्नील गवस आदी उपस्थित होते. 

तालुक्याच्यावतीने पालकमंत्र्यांचे आभार

आमच्या पक्षाचे नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी जी अवैध धंद्याच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे बरेच धाबे दणाणले आहे. सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. छोट्या मोठ्या कारवाया करताना देखील दिसून येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे दोडामार्व तालुक्याच्यावतीने त्यांचे आमही जाहीर आभार मानतो असे दीपक गवस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

स्थानिक अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहणार

येणाऱ्या गणेश चतुर्थी या पवित्र सणाला जर तालुक्यात कुठेही अवैध प्रकारे दारू विक्री सुरू दिसल्यास त्याठिकाणी जबाबदार असणारे पोलिसांचे स्थानिक बीट अंमलदार किंवा पोलिस शिपाई जबाबदारा असणार आहेत. आणि आम्ही अशाप्रकारची दारू विक्री निदर्शनास आणून दिल्यास त्या बीट अंमलदाराचे निलंबन झाल्यास त्यास आम्ही पक्ष म्हणून अथवा स्वतः जबाबदार नसणार आहोत याची आताच नोंद घ्यावी असाही सज्जड दम यावेळी दीपक गवस यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. दोडामार्ग तालुक्यात खुलेआम रस्त्याच्या शेजारीच सध्या दारू विक्री सुरू आहे. अशाप्रकारे व्यवसाय करणाऱ्यांनी आताच सावध होऊन आपले व्यवसाय बंद करावेत. यानंतर आढळून आल्यास कारवाई निश्चित होईल त्यावेळी गय केली जाणार नाही आहे असेही गवस यांनी सांगितले. येणाऱ्या चाकरमान्यांना ही याप्रकारे त्रास होता नये याची दक्षात घेतली जावी अशीही मागणी यावेळी गवस यांनी केली.  

मुळापर्यंत तपास होणार 

चतुर्थी सणात दारू पिणार कोणी आढळून आल्यास त्याने ती दारू कोणत्या दुकानातून आणली. याची चौकशी करून त्याप्रकारे या अवैध दारू विक्रीला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असाही इशारा दीपक गवस यांनी यावेळी दिला. 

अवैध दारू विक्री आढळून आल्यास कारवाई करणार : पोलिस निरीक्षक 

येणाऱ्या काळात जर तालुक्यात कुठेही अवैध दारू विक्री आढळून आल्यास दोडामार्ग पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाणार आहे. गणपती सणात कोणतेही विघ्न येणार नाही. आपल्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर होणार नाही याची दक्षात घेतली जाणार आहे. शिवाय येणाऱ्या चाकरमान्यांचा ही विचार करून त्याप्रकारे आम्ही नियोजन केले असल्याचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले.