तांबळडेग विठ्ठल रखुमाई मंदिरांत अखंड हरिनाम सप्ताह

Edited by:
Published on: January 28, 2025 15:35 PM
views 122  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे ५ फेब्रुवारी पासून श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरांत सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत आहे. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्तीचारी साधियेल्या।। या संत ज्ञानेश्वर यांच्या उक्तीनुसार तांबळडेग येथे सालाबादप्रमाणे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरांत सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह मिती माघ शु. ८ शके १९४६ बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यावेळी सौ. प्रमिला प्रफुल्ल. वेंगुर्लेकर या दांपत्याला पूजेचे मानकरी म्हणून मान देण्यात आला आहे.

बुधवार दि. ५ रोजी सकाळी ठीक १०.३० वा‌ अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होऊन सलग सात दिवस या सोहळयात देवगड पंचक्रोशितील मेळे आणि रोज रात्री धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक कथांच्या चित्ररथाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शनिवार हा एकादशीचा दिवस आहे. बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सांगता व दहिकाला होईल. त्यादिवशी रात्रौ १० वाजता नवतरुण नवरात्र उत्साही मंडळ, तांबळडेग यांच्या सौजन्याने एकात्मिक विकास मंडळ, मोर्वे प्रस्तुत ‘ रंगी रंगला विठ्ठल; वारकरी दिंडी’ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा महाप्रसाद (समाराधना) भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे अध्यक्ष . महादेव नामदेव केळुसकर, काका मुणगेकर, अँड. राज कुबल, मुंबई समिती सचिव गणपत भिवा सादये मुंबई समिती प्रमुख यांनी संयुक्तपणे आवाहन केले आहे.