
कणकवली : सावंत फाऊंडेशन संचालित डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली (श्रीनगर) व सर्व्हिस सिव्हिल इंटर नॅशनल संस्था, सिंधुदुर्ग विभाग आयोजित , जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. 'उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी' हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. या वाक्यावर आधारित विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतात. या वर्षी महादेव सीताराम सावंत (अप्पा डोंगरे) यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांनी आर्थिक सहकार्य केले आणि यातूनच या वर्षाचा शुभारंभ शैक्षणिक कार्यक्रमाने शुक्रवार दिनांक २० जानेवारी रोजी शिवडावयेथून करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक व फाऊंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत, खगोल अभ्यासक अनुराग शेवडे व त्यांचे सहकारी खगोल अभ्यासक अमोल भाईंदरकर व श्री योग गुरू डॉ.योगीराज महाराज व सावंत फाऊंडेशनचे प्रोग्राम सहायक विशाल गुरव उपस्थित होते.
अंतराळातील अंतरंगाच्या अंतरंगात दडलंय काय? खरं तर हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते, पण ते जाणून घेणे तसं ते उघड्या डोळ्याने पाहणं शक्य नाही, पण आता हे शक्य झालंय ते 'डॉ. रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र' कळसुली आयोजित आकाश दर्शन कार्यक्रमामुळे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक, पालक, आणि विद्याथर्थ्यांसाठी अगदी मोफत आयोजित करत या सुवर्ण संधीचा लाभ स्थानिक तालुक्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने दोन दिवस घेतला.
शुक्रवार दि.२० जानेवारी रोजी आकाश दर्शन कार्यक्रमास शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यरेखा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे एकूण विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक संजय मसवेकर,सहाय्यक शिक्षक राजेश वाळके, मुकेश पवार, रिया गोसावी, धनश्री पाताडे,श्री. दर्शन आदी उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यालय नाटळचे एकूण विद्यार्थी, शिक्षक चंद्रकांत तांबे, रजनीकांत नार्वेकर, ओंकार हळदीवे, आर्या कांबळी, प्रणिता बांबुळकर आणि भालचंद्र सावंत (शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष) यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच या सर्व मुलांना बसची व्यवस्था नाटळ येथील अनिल सावंत यांनी करून दिल्यामुळे त्यांना मुलांना आणणे - नेणे सुखकर झाले आणि याच कार्यक्रमासाठी नरडवे इंग्लिश स्कूल, नरडवे, तालुका - कणकवली यांनी ही आपले विद्यार्थी आणि शिक्षक मारुती कुंभार,मुग्धा परब उपस्थित होते.
याशिवाय पंचक्रोशीतील काही माजी विद्यार्थी कणकवलीवरून आलेले काही खगोल अभ्यासक, विद्यार्थी, पालक यांच्या समवेत मोठ्या उत्साहाने पार पडला.
शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी 'आकाश दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेचे आकाश दर्शनाला उपस्थित संस्था पदाधिकारी चंद्रशेखर महादेव दळवी, उपकार्याध्यक्ष कळसुली शिक्षण संघ मुंबई, विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस - कळसुली शिक्षण संघ मुंबई, महादेव धोंडू नाईक, सल्लागार कळसुली शिक्षण संघ मुंबई, कृष्णा रामचंद्र दळवी चेअरमन - स्कूल कमिटी, नामदेव रामचंद्र घाडीगावकर, व्हाईस चेअरमन - स्कूल कमिटी, अतुल सुभाष दळवी सदस्य - स्कूल कमिटी आणि उपस्थित शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व्ही. व्ही. वगरे, मुख्याध्यापक,एस. के. सावळ वरिष्ठ शिक्षक, एस. एल. आर्लेकर - सहा. शिक्षक, श्री. आर. डी. घुगे - सहा. शिक्षक, श्री. सी. जी. चव्हाण - सहा. शिक्षक, सौ. एम. एम. दळवी - सहा. शिक्षिका,सौ. सी. सी. चव्हाण - सहा. शिक्षिका,श्री. ए. पी. पवार - सहा. शिक्षक, सौ. ए. वाय. सुतार - सहा. शिक्षिका, श्री. ए. जी. सावंत - सहा. शिक्षक, श्री. एस. ए. परुळेकर - सहा. शिक्षक, श्री. बी. आर. पालव - सहा. शिक्षक,श्री. सी. एम. राणे - सहा. शिक्षक, श्री. आर. एस. नाईक - संगणक शिक्षक आर . जी. कदम - शिपाई, श्री. जी. व्ही. तेली - शिपाई, श्री. पी. एस. नाईक - शिपाई यांच विशेष सहकार्य लाभले. कळसुली कार्यक्रमासाठी 'कोकण साद' चे पत्रकार समीर सावंत सहकुटुंब सहपरिवार उपस्थीत होते. याच बरोबर पणदूर 'सविता' आश्रमात शिकणाऱ्या पाच मुलींनी आणि एक मुलानं हजेरी लावली कणकवलीतीलही काही हॊशी विद्यार्थी पालक हजर होते.आणि सर्वात महत्वाची जबाबदारी आमचे सारथ्य करणारे श्री प्रशांत सावंत सर्वांना सुरक्षित वेळेत आणि महत्वाच्या आमच्या किमती दुर्बिणी अगदी व्यवस्थित नेऊन परत आणण्यास आपली मोलाची मदत केली त्या बद्दल सावंत फौंडेशन तर्फे त्यांचे आभार व धन्यवाद
दोन्ही दिवसाच्या कार्यक्रक्रमाचे उदघाटन संध्याकाळी साडेपाच वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सरस्वती पूजनाने झाले. सर्वच उपस्थितांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता दुर्बिणीने आकाश पाहण्यासाठी वाढत होती. आयोजकांना ही शुक्र, शनी सुर्यास्तानंतर लवकर मावळणारे ग्रह मुलांना आवर्जून दाखवायचे होते. पाहिलेले सेलेस्टीयल ऑब्जेक्ट्स (खगोलीय वस्तू) -- शुक्र ,शनी, गुरू, मंगळ इत्यादी ग्रह, सध्याचे दुर्मिळ आकर्षण म्हणजे धूमकेतू C/2022 E3 ZTF, अनेक अनेक दूरस्थ खगोलीय वस्तू जसे की बंदिस्त तारका गुच्छ, मृत ताऱ्यांचे चकतीसदृश्य अवशेष, वसिष्ठ द्वैती तारा सर्वात महत्वाचे- विविध तारकासमूह, राशि, नक्षत्रांची नुसत्या डोळ्यांनी कसे ओळखावे? याची माहिती मिळाली व सूर्य तेजाने २०% झाकोळलेला भाग वगळता उर्वरीत ८०% आकाशाची ओळख झाली. एवढे सगळे लक्षात ठेवण्यास सोपे जावे म्हणून भारतीय व पाश्चिमात्य पौराणिक कथा सांगण्यात आल्या. त्या जोडीने हा सगळा नक्की काय प्रकार आहे याचा उलगडा व्हावा म्हणून अत्याधुनिक खगोलशास्त्रीय माहिती देखील देण्यात आली. संस्थेविषयी अधिक माहिती साठी
संपर्क करण्यासाठी या ई-मेल आयडी वर ई-मेल करावा.sawant_foundationorg@gmail.com आणि sawant_foundation@outlook.com
या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य करणारे सावंत फाऊडेशनचे ट्रस्टी, सभासद तसेच विशेष स्वरुपात दुर्बीण भेट देणार दिलीप भोसले, नितिन दुसाने, प्रवीण आंब्रे, विकास जनरल स्टोअर कणकवलीचे मालक यांचे आयोजकांनी आभार मानले.
याचबरोबर सावंत फाऊंडेशनतर्फे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर भर यापुढे ही दिला जाईल. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वानी सहभाग घ्यावा, असे आवाहन शरद सावंत यांनी केले आहे.