
चिपळूण : आयुष्यभर कॉंग्रेसने अल्पसंख्यांक समाजाची मते घेतली , मात्र अल्पसंख्यांक आयोगाला शासकीय निधीची हमी दिली नाही. अजितदादांनी उपमुख्यमंत्री झाल्यावर, महायुतीच्या सरकारमार्फत अल्पसंख्यांक आयोगाच निधी दुप्पट केला आहे. देशात एन.डी.ए. आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. असे एकत्रित सरकार चालवत असताना मित्रपक्षामधील काही मंडळी अल्पसंख्यांक समाजाबद्दल काही अपशब्द बोलतात, त्यांच्या भूमिकेशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बिलकूल सहमत नाही, असे प्रतिपादन लोकसभा रायगड रत्नागिरी चे खासदार सुनील तटकरे यांनी केले.ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित, चिपळूण येथील जन सन्मान यात्रेच्या सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले पूर्वीच्या युतीच्या सरकार मधील निवडून आलेल्या उमेदवाराचे मतदानाचे मोठ्या फरकाचे लीड तोडून, २०१९ ला शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मोठ्या फरकाने चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून निवडणूक आले. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि दुर्देवाने आलेल्या कोरोना, निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आली. चिपळूण शहर जुलै २०२१ मध्ये महापूरात बेचिराख झाले . अशा संकटातून त्या काळात अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नात्याने कोकणाला पाठबळ दिले. महापूरानंंतर चिपळूण शहरातील जनतेच्या सोबत आमदार शेखर निकम भक्कमपणे उभे राहून, शहराचे प्रश्न आणि अडचणी शासनाकडे मांडून पाठपुरावा करीत राहिले, वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी १५ कोटीचा निधी शासनाकडून आणला. म्हणूनच
आज चिपळूण शहर आज पुन्हा दिमाखात उभे आहे. असा सुमारे अडीच हजार कोटीचा निधी या चिपळूण संगमेश्वर तालुक्यात पहिल्यांदाच आमदार शेखर निकम यांनी आणला आहे. पूर्वीच्या इतर कोणत्याही आमदारांनी एवढा निधी आणलेला नाही. यावेळी ते म्हणाले , देशात आणि राज्यात , संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार खोलवर विरोधकांकडून रुजवला गेला , मात्र चंद्र सुर्य असेपर्यंत या देशाचे संविधान कणी बदलू शकणार नाही.
सुनील तटकरे म्हणाले, या परिसरातील एक मोठी पतसंस्थेकडून कर्जवसुलीसाठी नोटीसा पाठविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. हातातील पतसंस्था, साधन संपत्ती चा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा जाहीर इशारा त्यांनी , नाव न घेता चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेस दिला आहे. यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी पतसंस्थेचे काही संचालक ही उपस्थित होते. याबाबत चिपळूण नागरी च्या चेअरमन आणि पदाधिकारी अथवा प्रतीस्पर्धी संभाव्य उमेदवार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.