
सावंतवाडी : आमच्या भांडण लागावीत यात मिडीयाला इंटरेस्ट असतो. आमची युती मजबूत आहे. डबल इंजीनच सरकार आहे. आम्ही जो उमेदवार उभा करू तो निवडून येणार आहे. आम्हांला लोकांसाठी काम करायच आहे. ते काम आम्ही करतोय. १४ मार्चला सरकार पडणार असा दावा करणाऱ्या विरोधकांबद्दल विचारल असता ते म्हणाले, जे लोक झोपतात ते स्वप्न बघतात. त्यांची स्वप्न खरी होतात असं बिलकुल नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्याबळ आहे. आमचं डिस्कॉलीफाई होणार नाही. व्हीप मोडायला दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्याबळ लागत. आम्ही संख्याबळ असताना स्वतःचा पक्ष स्थापन करू शकलो असतो किंवा दुसऱ्या पक्षात जाऊ शकलो असतो. पण, आम्ही गेलो नाही कारण खरे शिवसैनिक आम्ही आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. पक्षात फुट पडलेली आहे. आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसैनिक बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत. आमचं निलंबन होऊ शकत नाही. अजित पवारांनी कितीही स्वप्न बघितली, ते झोपत नाहीत. इतर लोक १० वाजेपर्यंत झोपतात. अजितदादा सकाळी सहा वाजता उठतात. निदान त्यांनीतरी असं बोलू नये असा टोला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक उपस्थित होते.