
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची तयारी सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील दर्शन विद्या एजुकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे एआय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या एका नवीन उपक्रमांतर्गत, स्पीचलेट फाऊंडेशन्सने एआय-आधारित शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची प्रगती साधून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणे हा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यात मदत होईल. विशेषतः जे विद्यार्थी JEE आणि NEET सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये जातात, त्यांना आता सिंधुदुर्गातच उच्च दर्जाचे शिक्षण घेता येणार आहे. बाहेरगावी जाण्यामुळे निवास आणि भोजन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्या समस्यांवर या उपक्रमाने मात करता येईल असे मत निरवाडे येतील संस्कार नॅशनल स्कूल अध्यक्ष डॉ शेखर जैन यांनी व्यक्त केले .
सध्या सहावी आणि सातवीच्या वर्गांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑक्टोबरपर्यंत आठवी, नववी आणि पाचवीचे वर्गही सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील वर्षापासून ११वी आणि १२वी सायन्स वर्गही सुरू करण्याचा मानस आहे. या शिक्षण प्रणालीत स्मार्ट बोर्डचा वापर केला जाईल आणि तंत्रज्ञान व शिक्षणाचा मिलाफ करून विद्यार्थ्यांना शिकवले जाईल.
या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या कमी असलेल्या क्षमता ओळखता येतील आणि एआयच्या मदतीने त्या सुधारता येतील, ज्यामुळे त्यांच्या विकासाची गती वाढेल. तसेच, शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ताही एआयच्या माध्यमातून वाढेल असे या उपक्रमाचे प्रवर्तक सांगतात.
सध्या सुरू असलेल्या अनेक खाजगी क्लासेसच्या उच्च शुल्काच्या तुलनेत, या उपक्रमात कमी शुल्क आकारले जाईल, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना JEE आणि NEET फाऊंडेशन कोर्सेसचा लाभ घेता येईल. १२वीनंतर NEET किंवा JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
हा संपूर्ण उपक्रम एआय-आधारित आणि क्लाउड-आधारित असून तो इंटरनेटच्या माध्यमातून चालवला जाईल. तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा मिलाफ करून शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.तसेच या प्रशालेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात .स्पर्धात्मक उपक्रम राबविले ज जातात मुलाची गुणवत्ता तसेच व स्पर्धेच्या युगात टिकून राहता यावे या हेतूने प्रयत्न केले जात आहे . या विद्यालयात शिस्तीचे धडे तसेच स्काऊट गाईड या सारखे निवन उपक्रम सुरु होत आहेत तसेच या विद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धात विद्यार्थी यांनी चांगले यश संपादन केले तालुका जिल्हा राज्य स्तरावर पण या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या संस्कार नॅशनल स्कूल अभ्यासक्रम व उपक्रम विषयी स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर .सी ई मनिष सावंत आणि कृतिका सुभेदार यांनी माहिती चांगल्या प्रकारे सादर केली ग्रामीण भागीतील विद्यालय असून पण या विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात हि बाब गौरवास्पद आहे