
दोडामार्ग : तालुक्यातील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी आणि त्याचे फायदे काय आहेत यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालय येथे अॅग्रीस्टॅकचे विशेष शिबीर 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. याचा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी केले आहे.
अॅग्रीस्टॅक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना युनिट फार्मर आयडी मिळतो, ज्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतो. तसेच पीक कर्ज, विमा, खते, आणि बियाणे घेण्यासाठी सोपे पडते या मोजणेमुळे शेतकऱ्यांची माहिती एकत्र मिळते. त्यामुळे त्यांची डिजिटल स्वरूपात ओळख होते. यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही अॅग्रीस्टॅक नोंदणी करून याचा लाभ घ्यावा यासाठी तहसील कार्यालय इथं बुधवारी 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.










