
सावंतवाडी : तळवडे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथील विष्णू पेडणेकर यांचे शेतामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले . मॅट पद्धतीने रोपवाटिका करुन आठ ओळीच्या मशीनने लागवड पूर्ण करण्यात आली . सदर लागवडीचा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांचे हस्ते झाला . या कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी पी . पी . पाटील , तहसिलदार श्रीधर पाटील , गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषि अधिकारी गोरखनाथ गोरे , सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सभापती पंकज पेडणेकर, कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, मंडळ अधिकारी नलवडे तळवडे सरपंच वनिता मेस्री, कृषि सहाय्यक ममता तुळसकर, प्रिया सावंत, छाया मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .
यावेळेस कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे यांनी मॅट रोपवाटिका व यांत्रिक भात लागवडीबद्दल माहिती दिली . प्रसाद पेडणेकर यांनी ही भात लागवड पद्धत कमी वेळेत व कमी खर्चात होणारी व तणावमुक्त आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत व इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व मते जाणून घेतली तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन केले . यावेळेस वरील सर्व अधिकारी यांनी स्वत : यंत्राद्वारे भात लागवड केली .