
वैभववाडी : पावसामुळे भात,नाचणी या पिकांची कापणीची कामे लांबली आहेत. या पिकांचे सध्या वन्यप्राण्यांकडुन नुकसान सुरू आहे.या पिकांचे संरक्षण करण्यासाठी बंदुका शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक आहे.त्यामुळे प्रशासनाने शेती सरंक्षण बदुंका जमा करू नये अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे आज (ता.२५)केली.
विधानसभा निवडणुक आचारसहिंतेमुळे पोलीस प्रशासनाकडुन शेतकऱ्यांना शेती सरंक्षण बदुंक जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.तातडीने बंदुका जमा करा असे सांगीतले जात आहे.परंतु यावर्षी पाऊस लांबल्यामुळे अजुनही भातपिकांची कापणी झालेली नाही.त्यातच परिपक्व झालेल्या भातपिकांचे वन्यप्राण्याकडुन मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे.अशातच आता प्रशासनाकडुन बदुंका जमा करण्यासाठी तगादा लावला जात आहे.बदुंकाशिवाय पिकांचे सरक्षंण करायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर आहे.त्यातच वैभववाडी तालुक्याचा बराचसा भाग हा जंगलमय आहे.गव्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
रानडुक्कराकडुन भातपिकांचे नुकसान सुरू आहे.त्यामुळे प्रशासनाने बंदुका जमा करण्याच्या आदेशाचा पुर्नेविचार करून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसिलदारांना दिले आहे.यावेळी शेतकरी विजय रावराणे,डी.के.सुतार,रमेश सुतार,नवनाथ गुरव आदी उपस्थित होते.