
सिंधुदुर्गनगरी : कंपनी आणि प्रदुषण मंडळाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण आंदोलन सायंकाळी उशिरा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास स्थगित करण्यात आलं. जो पर्यंत प्रदूषण महामंडळाने सुचविलेल्या अटी व शर्थी पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत ही कंपनी पूर्णपणे बंद ठेवण्याचे कंपनीने लेखी पत्र जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच प्रदूषण महामंडळाचा अहवाल सोमवार पर्यंत प्राप्त होईल असे आश्वासन या वेळी प्रदूषण विभागाच्या वतीने लेखी पत्राद्वारे देण्यात आला. यानंतर उपस्थितांनी हे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.