युवासेना आक्रमक ; ST धरल्या रोखून

Edited by: भरत केसरकर
Published on: July 03, 2023 13:47 PM
views 290  views

कुडाळ : माणगाव तिठा येथे आज दुपारी युवा सेनेच्या वतीने कुडाळ एसटी महामंडळ प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या सावंतवाडी कुडाळ ये जा करणाऱ्या एसटी बसेस रोखून धरल्यामुळे ट्राफिक जाम झाले आहे. उबाठा युवासेनेचे कुडाळ तालुका युवासेना अध्यक्ष योगेश धुरी यांनी आज विद्यार्थी एस.टी.बससाठी माणगाव तिठा येथे एस.टी.बस रोखत अनोखे रस्ता रोख आंदोलन केले.

बेनगाव हायस्कूल च्या विद्यार्थी वर्गाला एस.टी.बस मिळत नसल्याने हे आंदोलन योगेश धुरीं च्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले. सावंतवाडी डेपोच्या सर्व एस.टी बस माणगाव तिठा येथे उबाठा युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून रोखून धरण्यात आल्या. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.