
कणकवली : राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या.
निवडणुकीचा कार्यक्रम : तहसिलदर निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : १८ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची मुदत : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अर्ज छाननी : ०५ डिसेंबर अर्ज मागं घेण्याचा दिनांक : ७ डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : ७ डिसेंबर दुपारी ३ नंतर मतदानाची तारीख : १८ डिसेंबर मतमोजणी आणि निकाल : २० डिसेंबर
निकालाची अधिसूचना : २३ डिसेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात 38, दोडामार्ग - 28, कणकवली - 58, कुडाळ - 54, मालवण - 55, सावंतवाडी - 52, वैभववाडी - 17 आणि वेंगुर्ला 23 अशा ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.