
वेंगुर्ला : सन २०१४ पासून मोदी सरकार आल्यानंतर ख-या अर्थाने महिलांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची कामगिरी बजावली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ल्याच्या गौरवात भर घालणा-या निवडक दहा महिलांचा केलेला सन्मान हा स्तुस्त उपक्रम असल्याचे गौरवोद्गार भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी वेंगुर्ला येथे काढले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी वेंगुर्ला भाजप कार्यालयात महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यात संगीत क्षेत्रात मानाची पदवी मिळवून ते ज्ञान भावी पिढीपर्यंत हस्तांतरीत करणा-या विणा दळवी (होडावडा), निसर्ग आणि इकॉनॉमी यांचा उत्तम सांगड घालत काथ्या उद्योगासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या रूची राऊळ (कुशेवाडा), नाट्य क्षेत्रात १२०० हून अधिक संगीत, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणा-या मिताली मातोंडकर (मातोंड), फोटोग्राफीसारख्या पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणा-या स्मिता कासले (वजराट), दशावतारात पखवाज करणारी पहिली व एकमेव महिला भाविका खानोलकर (खानोली), थाई बॉक्सिंग क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली योगा प्रशिक्षक मारिया अल्मेडा (उभादांडा), संगीत क्षेत्रातील शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखविणारी अमृता पेडणेकर (उभादांडा), विविध अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करणारी गायत्री कासले (रामघाट), एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली आराधना कुंडेकर (दाभोली), दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारी आणि सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली प्राजक्ता माळकर उर्फ जपा (तुळस) यांचा समावेश होता.
याप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, श्रेया मयेकर, पपू परब, प्रार्थना हळदणकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, समिधा कुडाळकर, हसिनाबेन मकानदार यांच्यासह दिलीप परब, दिगंबर आरोसकर तसेच सत्कारमूर्तींचे कुटुंबिय उपस्थित होते.