
मालवण : गेली कित्येक वर्ष रखडलेल्या वराड-सोनवडेपार पुलाच काम अखेर पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. गेली काही वर्षे केवळ आश्वासनाच्या हिंदोळ्यावर असलेल्या या पूलाला स्थानिक आमदार व खासदारांनी केवळ निवडणूक मुद्दा बनवून वराड-सोनवडे वासीयांना झुलवत ठेवायचं काम केलं होतं अशी टिकाही झाली होती. त्यानंतर या बाबतीत स्थानिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नव्हतं. शेवटी स्थानिकांनी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी PMGSYयोजनेच्या अधिकाऱ्यांसहित या पुलाची पहाणी करत, लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आदेश निलेश राणे यांनी दिले होते.
निलेश राणेंच्या दणक्यानंतर या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी प्रशासनाला लागणारी सर्व मदत करण्याचं आश्वासन निलेश राणे यांनी दिल आहे. सदरचा पूल कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणारा महत्वाचा पूल असून त्याच बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केले जात आहे.