शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षण हक्क कृती समितीचं आंदोलन मागे

Edited by: भरत केसरकर
Published on: December 10, 2023 11:43 AM
views 341  views

सावंतवाडी : शिक्षण हक्क कृती समितीने विविध मागण्यासाठी 11 डिसेंबरला पुकारलेल्या बेमुदत शाळा बंद आंदोलनाच्या इशारा नंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि सिंधुदुर्ग शिक्षण हक्क समितीच्या जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि इतर सर्व माध्यमिक संघटना यांच्यासोबत दीपक केसरकर यांची महत्वपूर्ण बैठक काल रात्री उशिरा दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

या बैठकीतील सकारात्मक चर्चा होवून यानंतर शिक्षण हक्क समिती, सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती, अध्यापक संघ, कास्ट्राईब संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मराठा शिक्षक संघटना, शिक्षक सेना या सर्व माध्यमिक शिक्षक संघटनानी सहभाग दर्शवला होता.

तात्काळ वेतनेतर अनुदान द्यावे, मुख्याध्यापक आणी शिक्षकांची पदे भरण्यास तात्काळ परवानगी मिळावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी.अशा विविध मागण्या साठी हे बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आपण तात्काळ मिटवणार आहे. यासाठी या प्रश्नांची यादी करून लवकरच बैठक घेणार असल्याचे सकारात्मक  आश्वासन दीपक केसरकर यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.