ताईंच्या टीकेनंतर भाईंची पवार भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 28, 2023 17:24 PM
views 1166  views

सिंधुदुर्ग : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देशाचे ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांची  सदिच्छा भेट घेतली. शालेय व माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये होत असलेले बदल, अपेक्षित सुधारणा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारण अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पवार-केसरकर यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आल आहे.

शुक्रवारी पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे सिंधुदुर्गात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता  जोरदार हल्लाबोल केला होता. तर सुळे यांनी संयम राखावा,  अन्यथा शरद पवारांकडे त्यांची तक्रार करावी लागेल असं ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांची दीपक केसरकर यांनी भेट घेतल्यान राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. केसरकर समर्थक शिवसैनिक व सुळे समर्थक राष्ट्रवादीच्या समर्थकांत पोश्टर वॉर रंगताना पहायला मिळत आहे.