Monsoon Update ; मान्सूनची आगेकूच ; कोकणात कधी ?

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 30, 2023 14:56 PM
views 81  views

सिंधुदुर्ग : १९ ते २९ मे २०२३ या कालावधी दरम्यान अंदमान समुद्रात रेंगाळलेला नैऋत्य मान्सून आज, ३० मे २०२३ रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापून पुढे सरकला आहे. (उपरोक्त नकाशामध्ये निळ्या रांगाच्या रेषेद्वारे नैऋत्य मान्सूनची वास्तविक सीमा दाखवण्यात आलेली आहे)

नैऋत्य मान्सूनची उत्तर सीमा आता ५° उत्तर अक्षांश/८०° पूर्व रेखांश, ६.५°उत्तर अक्षांश/८३°पूर्व रेखांश, १०°उत्तर अक्षांश/८८°पूर्व रेखांश, १४°उत्तर अक्षांश/९२°पूर्व रेखांश आणि १७°उत्तर अक्षांश/९५°पूर्व रेखांशा मधून जाते.

नैऋत्य मान्सून पुढील 2-3 दिवसात मालदीव आणि केप कामोरिन क्षेत्राच्या काही भागात, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्य बंगाल उपसागराच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.



कोकणात कधी ? 

तर हा पाऊस 5 ते 10 जूनपर्यंत कोकणात पोहचण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदेच्या प्रमुखांनी दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.