
सावंतवाडी : माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी ॲड. निता कविटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
२० नगरसेवक पदासाठीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. युतीच्या चर्चा चर्चेतच असल्याने स्वबळावर लढण्याची तयारी दोन्हीकडून करण्यात आली आहे. उद्या सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे












