
सावंतवाडी : अॅड. अभिजित सुभाष पणदुरकर यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. गेली 14 वर्ष ते विधी सेवेत कार्यरत आहेत. सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालयाच्या विविध खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. वकिली व्यवसायासोबतच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत आहेत. लायन्स क्लबचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत.
अँड. सुभाष पणदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.