
सावंतवाडी : निरवडेतील एमटीडीसी परवानगी असलेल्या हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलांना रूम्स बुकिंग का दिले ? हॉटेल मालक रजिस्टर का मेन्टेन करत नव्हते ? याबाबत निरवडे ग्रामस्थांचावतीने पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचाकडून कडक कार्यवाही करण्याची मागणी देखील केली आहे.
पोलिस यंत्रणेला निरवडे युवक तसेच तमाम ग्रामस्थ त्यांचा तपास कार्यात सहकार्य करतील यात काही दुमत नाही. पण, पोलिस प्रशासान कडक कार्यवाही करण्यासाठी असमर्थ ठरले तर पुढील होणाऱ्या ग्रामस्थांच्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भुषण बांदिवडेकर यांनी दिला आहे.