वैभववाडीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

33 मतदान केंद्रावर 165 अधिकारी-कर्मचारी दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 17, 2022 21:40 PM
views 166  views

वैभववाडी : तालुक्यातील ११ ग्रामंपचायतीच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. आज  ३३ मतदान केंद्रावर १६५ अधिकारी-कर्मचारी मतपेट्यासहीत दाखल झाले.११ सरपंच आणि ४८ सदस्यांसाठी उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासुन मतदानाला सुरवात होणार आहे.या 

तालुक्यातील १७ पैकी सहा ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर उद्या ११ ग्रामपंचायतीची निवडणुक होणार आहे.११ सरपंचपदाकरीता ३८ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत.४८ सदस्यांसाठी ९६ उमेद्वार निवडणुक रिंगणात आहेत..या निवडणुकीत ११ हजार ३७ मतदारांना हक्क बजाविता येणार आहे.उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासुन मतदानाला सुरूवात होणार आहे.दरम्यान निवडणुकीची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे.११ ग्रामपंचायतीसाठी एकुण ३३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या मतदान केंद्रावर आज (ता.१७) सकाळीच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह ४ अधिकारी-कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले आहेत.एकुण १६५ अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर असणार आहेत.सुरक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी असणार आहे.याशिवाय ११ निवडणुक अधिकारी,२ झोनल अधिकारी आणि तीन राखीव अधिकारी ठेवण्यात आले आहेत.

   मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव या सर्वावर लक्ष ठेवून आहेत.