
सावंतवाडी : ठाकरे शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज माजगाव कासारवाडा येथे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांच्या घरी जात स्वागत स्वीकारले. यावेळी त्यांनी उपस्थितांचा सेल्फी काढून दाद दिली.
त्यांचा सत्कार कासार कुटुंबीयांनी केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, समन्वयक बाळा गावडे, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, महिला संघटक जान्हवी सावंत, तालुका संघटक किर्ती कासार, गुणाजी गावडे, सागर नाणोसकर, आबा सावंत, दिनेश सावंत आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांनी आदित्य ठाकरे यांचा सन्मान केला. यानंतर खळा बैठक पुढे असल्याने या ठिकाणी उपस्थित शिवसैनिकांचा स्वतः आदित्य ठाकरे यांनी सेल्फी काढून दाद दिली तसेच शिवसैनिक व उपस्थितांना फोटोसाठी पोज दिली.










