आदर्श सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांचा कणकवली पं. स.च्यावतीने सत्कार

आदर्श सरपंच गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 13, 2022 13:36 PM
views 352  views

कणकवली : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा असलदे गावचे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांना आदर्श सरपंच गौरव पुरस्कार मिळाला. त्याबद्दल कणकवली पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांचा सत्कार केला. स्मार्ट ग्राम साकेडी सरपंच रीना राणे, कोळोशी सरपंच ऋतिका सावंत या सरपंच प्रशिक्षण पुणे येथील मार्गदर्शन कार्यक्रमाला गेल्याबद्दल पुष्पगच्छ देऊन सत्कार केला.


कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आर. एल.शिंदे , आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षक पंढरीनाथ मानगावकर, रितू रवींद्र पांचाळ, तसेच अधीक्षक श्री. परब , वरिष्ठ सहाय्यक देविदास आडबे, श्रीमती पोकळे ,कनिष्ठ सहाय्यक उपस्थित होते.