
कणकवली : सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्वीविजा वृध्दाश्रम मद्ये पितृपक्ष निमित्त अन्नदान व आर्थिक मदत केली. गेली अनेक वर्षे त्या हे समाजकार्य निस्वार्थीपणे करत आहेत. यावेळी जाणवली आदर्श नगर येथील अमोल राणे यांनी ही अन्नदान केले.
या आश्रमात ५६ आजी आजोबा आहेत. ह्या सर्वांच वेळच्या वेळी सर्व व्यवस्थीत करन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी संचालक आणि स्टाफ कर्मचारी यांना खूप मेहनत घ्यावी लागते. अक्षता कांबळी यांनी मालवणी गजाली सांगून आजी आजोबांना खूप हसवले. यावेळी अक्षता कांबळी यांच्यासमवेत सौ. मिलन पाटील, अर्चना राणे, सिद्धेश कांबळी, रविकिरण शिरवलकर, अमोल राणे, अनिल कांबळी उपस्थित होते. यावेळी आश्रमाचे संचालक संदेश शेट्ये आणि सर्व कर्मचारी यांनी कांबळी यांचे आभार मानले.