
कणकवली : मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याची शनिवारी कणकवली तालुक्यातील खारेपाटण नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विशेष उपस्थिती असणार आहे.
खारेपाटण, नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी या इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक मनोज गुळेकर यांना इन्स्पायर आयडल पुरस्काराने गोव्यामध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या नडगीवे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यंदाचा स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून मराठी व हिंदी सुपरस्टार श्रेयस तळपदे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अंकिता वालावलकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.