निलेश राणेंच्या स्वागतासाठी कार्यकर्ते एकवटले

झाराप इथं केले जाणार जंगी स्वागत
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 16:12 PM
views 220  views

कुडाळ :  माजी खासदार भाजप नेते निलेश राणे थोड्याच वेळात झाराप येथे दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

विजयादशमी दिवशी सोशल माध्यमावर निलेश राणे यांनी राजकीय संन्यास जाहीर केला होता. मात्र त्यानंतर आपला निर्णय मागे घेत निलेश राणे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. या राजकीय घडामोडीनंतर  निलेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येत आहेत. यासाठी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते झाराप येथे निलेश राणे यांच्या स्वागतासाठी एकवटले आहेत.